Ad will apear here
Next
केजे शिक्षण संस्थेत पदवीप्रदान सोहळा

पुणे : ‘विद्यार्थीदशेतच समाजसेवेची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कार्य केले, तर आपल्या आर्थिक उन्नतीसह मानसिक समाधानही मिळते. गुणवत्तेबरोबरच ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करुन सामाजिक भावना विकसित केली पाहिजे. कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तील परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

‘केजे शिक्षण संस्थे’च्या केजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग व ट्रिनिटी अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग या महाविद्यालयांच्या पदवीप्रदान सोहळ्यात डॉ. चव्हाण बोलत होते. 

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव के. बी. खिलारी, संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, केजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर, ट्रिनिटी अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. विजय वाढई यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याण जाधव म्हणाले, ‘आयुष्यात यशस्वी वाटचाल करण्यासाठी शिस्त, मेहनत व उत्तम दर्जा या तीन गोष्टी आत्मसात कराव्यात. अभियांत्रिकी क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकून घेतली, तर या संधींचा फायदा घेणाऱ्या अभियंत्यांना उज्ज्वल भविष्य आहे. नोकरीबरोबरच स्वत:चा व्यवसाय उभारण्याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.’

प्राचार्य डॉ. सुहास खोत प्रास्ताविकात म्हणाले, ‘केजे महाविद्यालयाच्या प्रिया अहिरवार व प्रकाश गावडे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. पुढील वर्षीही केजे महाविद्यालयाचा विद्यार्थी गुणवत्ता यादीत प्रथम येईल व महाविद्यालय हॅट्रिक साधेल.’ 
डॉ. प्रकाश डबीर यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZJZBM
Similar Posts
‘ट्रिनिटी’च्या अमरजित जाधवला मिळाले ७० लाखांचे पॅकेज पुणे : येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकीचा विद्यार्थी अमरजित जाधव याला अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनीत वार्षिक ७० लाखांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे, तर संस्थेच्या केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा
कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार पुणे : येथील ‘केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ आणि ‘केजे इन्फ्रा’चे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत नुकत्याच झालेल्या ‘नवभारत इन्फ्रा कॉनक्लेव्ह अँड अवार्ड’ कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कल्याण जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
केजे कॅम्पसमध्ये इन्फोसिसची भरती प्रक्रिया पुणे : येवलेवाडी येथील ‘केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ या संस्थेमार्फत अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या तीन हजारपेक्षा अधिक अभियंत्यांना नोकरीची संधी देण्यात आली आहे. ‘इन्फोसिस’ या अग्रणी कंपनीच्या वतीने केजे शिक्षणसंस्थेत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये देशभरातून तीन हजारपेक्षा अधिक उमेदवारांनी लेखी व मौखिक परीक्षा दिली
‘समतोल साधणारा अर्थसंकल्प’ ‘हा समतोल अर्थसंकल्प आहे. हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन, अॅनिमेशन या नव्याने विकसित होत असलेल्या अभ्यासक्रमांची पुस्तके बाहेरून आयात करावी लागतात. त्यावर लावण्यात येणारे आयात शुल्क योग्य नाही. अर्थसंकल्पामध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे उद्योग वाढीला चालना मिळेल.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language